अ‍ॅसीड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

0

भुसावळ- लग्न न केल्यास अंगावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी देत सातत्याने पाठलाग करीत अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चांदमारी चाळ भागातील 14 वर्षीय तरुणीचा गेल्या तीन महिन्यांपासून तर 29 मे च्या मध्यरात्री दोन वाजेपर्यंत संशयीत आरोपी मिहिर दिलीप तायडे व भारत जैस्वाल (भुसावळ) यांनी पाठलाग केला तसेच फिर्यादीने न केल्यास अ‍ॅसीड फेकण्याची धमकी दिली तसेच फिर्यादीच्या आईच्या मोबाईलवरही फोन करून धमकी देण्यात आली. दरम्यान फिर्यादी ही तिच्या काकांच्या घरी असताना संशयीत आरोपींनी तेथेदेखील जावून खिडक्या फोडत एक हजारांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.