अ‍ॅस्ट्रॅसिटीच्या गुन्ह्यात एकाला शिक्षा

0

जळगाव । पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादावरून एका महिलेला अ‍ॅस्ट्रॅसिटीच्या गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात एकुण आठ जणांवर पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची आज जिल्हा न्यायालयात कामकाज झाले असता यातील एका आरोपीस एक वर्षाची शिक्षा आणि 5 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयातून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी प्रमिलाबाई भिमराव ब्राम्हणे रा. खडकदेवळा यांच्याशी आरोपी भिवसन दगडू पाटील, गणेश दोधू पाटील यांच्यासह इतर 6 जणांनी शेतातील बांधाच्या किरकोळ कारणावरून वाद घालून जातीवाचक शिवीगाळ केली होती. याबाबत प्रमिलाबाई ब्राम्हणे यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायालयात आरोपी भिवसन दगडू पाटील, गणेश दोधू पाटील यांना न्यायालयात हजर केले असता न्या. चित्रा हंकारे यांनी आरोपी गणेश दोधू पाटील यास 1 वर्षाची शिक्षा आणि 5 हजार रूपये दंड आणि कलम 506 च्या गुन्ह्यात 1 महिन्याची साधी कैद अशी एकत्रित शिक्षा देण्यात आली आहे.