अ.भा.ग्रा.पत्रकार संघाची 15 रोजी जिल्हा बैठक

0

जळगाव : अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाची जळगाव जिल्हा कार्यकारीणी डिसेंबर 2016 मध्ये प्रदेश कार्यकारणीच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आली आहे. तर पुढील नवीन 2017 वर्षाची कार्यकारीणी 15 जानेवारी 2017 रोजी पद्मालय शासकीय विश्रामगृह जळगाव येथे बैठकीत दुपारी 1 वाजता जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात येणार आहे. बैठकीला जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान नुकतीच 3 जानेवारी 2017 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) येंथे अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाची राज्यस्तरीय प्रदेश कार्यकारीणीची बैठक संपन्न झाली यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा भगवान सोनार व जळगाव महानगर प्रमुख ललित खरे यांची निवड करण्यात आली.दरम्यान मार्च 2017 मध्ये अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे दोन दिवशीय राज्यस्तरीय पत्रकारांचे भव्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात पद्मश्री स्व. भवरलाल जैन उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार, नवरत्न दर्पण पुरस्कार, वितरण सोहळा तसेच ज्येष्ठ पत्रकारांचे प्रबोधन सत्र पत्रकारांना लाभणार आहे. या कार्यक्रमाचे मंत्री, आमदार, उद्योगपती, ज्येष्ठ संपादक मंडळींच्या हस्ते उदघाटन व पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या तालुक्यातील तालुका अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे अर्ज करावे. तसेच 30 जानेवारी पर्यंत जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारीणी घोषीत करण्यात येंईल. जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी बैठकीला उपस्थित रहावे अशी विनंती जिल्हाध्यक्ष भगवान सोनार, जळगाव महानगर प्रमुख ललित खरे यांनी केली आहे.