अ.भा. चैतन्य साधक परिवारातर्फे सत्संगाची जय्यत तयारी

0

प.पू. आनंद चैतन्य महाराज यांचा तीनदिवसीय गीता रामायण सत्संग
रविवारपासून सुरुवात – काडी कारखाना परिसरात सत्संग
चाळीसगाव – शहरातील शेतकरी सहकारी संघाच्या मालकीच्या काडी कारखाना परिसरात उभारल्या जाणाऱ्या हरिहर चैतन्य धाम येथे रविवारी 30 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तीन दिवसीय गी ता रामायण सत्संग समारो हाचे आयोजन करण्यात आले आहे परमपूज्य राष्ट्रीय संत लक्ष्मण चैतन्य बापू यांचे शिष्य हरिहर चैतन्य धाम भांबरवाडी निवासी परमपूज्य आनंद चैतन्य जी महाराज यांच्या मधुर वाणीतून हा गीता रामायण सत्संग समारोह होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या सत्संग समारोह कार्यक्रमाची उत्सुकता चाळीसगाव पंचक्रोशी मध्ये लागून राहिली आहे

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम
रविवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सायंकाळी भजन संध्या व दीपोत्सवाचा कार्यक्रम व त्याचप्रमाणे नगर संकीर्तन यात्रा 1 व 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या प्रमाणे दररोज दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान परमपूज्य आनंद चैतन्यजी महाराज यांचा गीता रामायण अंतर्गत त्यांच्या अमृतवाणीतून सत्संग समारोह होणार आहे. याकरिता चाळीसगाव तालुका अखिल भारतीय चैतन्यसाधक परिवार समितीतर्फे शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुका परिसरात बंजारा समाजाची मोठी वस्ती असल्याने या सत्संग समारोहाला दररोज हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतील यासाठी काडी कारखान्यातील सुमारे 5 एकर जागेत भव्य सभामंडपाचे काम सुरू आहे.

साधक घेत आहेत परिश्रम
या गीता रामायण सत्संग समारंभासाठी चैतन्य साधक परिवाराचे सदस्य मेहनत घेत आहे यात माजी जि प सदस्य सुभाषदादा चव्हाण , माजी पंचायत समिती सदस्य रामदास रायसिंग जाधव, पं.स. माजी सभापती विजय जाधव, कांतीलाल राठोड, करगावचे माजी सरपंच सुधाकर राठोड, संजीव राठोड, रमेश राठोड, चिंतामण राठोड यांच्यासह अनेक साधक परिवार शिष्यपरिश्रम घेत आहेत.