अ.भा.पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी विलास पाटील यांची निवड

0

जळगाव । ‘दैनिक जनशक्ति’चे चोपडा तालुका प्रतिनिधी विलास पाटील यांची अखिल भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांना जळगाव येथील कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक नवलसिंग राजपूत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

यांनी केले अभिनंदन

विलास पाटील यांच्या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. जीवनभाऊ चौधरी गटनेते न.प.,हितेंद्र देशमुख उपनगराध्यक्ष, एम व्हि पाटील उपसभापती पं.स., संजिव बाविस्कर शहराध्यक्ष, प्रदीप पाटील विकासो चेअरमन दोंदवाडे, गजेंद्र जैसवाल उपगटनेते नगरपालिका, धनंजय पाटील कृउबा समिती संचालक, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, मगन बाविस्कर, पप्पु पाटील घुमावल, शशी देवरे, चोसाका व्हा.चेअरमन, युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष सागर ओतारी, राजु बिटवा तालुका प्रमुख, विनोद पाटील, अलिमअली काझी, माजी उपसरपंच, चद्रंकांत पाटील, माजी उपसरपंच, छोटु शेटे, सुधिर कासट, तुषार सुर्यवंशी, पि.आ. माळी,सचिन जैसवाल आत्माराम पाटील लासुर राकेश पाटील वडगांव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जिल्ह्याची जबाबदारी
अखील भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक नवलसिंग राजपूत, केंद्रीय उपाध्यक्ष राकेश कोल्हे व शशिकांत राजवैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विलास पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या कार्यकारिणीच्या गठणासह पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्याची कामगिरी प्रदान करण्यात आली आहे.