जळगाव-अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना, आंदोलनांना व्यापक प्रसिद्धी मिळावी, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्धीप्रमुख नेमण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यासाठी ‘देशदूत’चे डॉ. गोपी सोरडे, तर धुळे-नंदुबार जिल्ह्यासाठी ज्येष्ठ पत्रकार गो.पी. लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार आणि नाशिक विभागीय सचिव मन्सूरभाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी नाशिक विभागातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची यादी जाहीर केली. तसेच नाशिक जिल्ह्यासाठी पत्रकार प्रमोद दंडगव्हाळ, जळगाव जिल्ह्यासाठी डॉ. गोपी सोरडे, अहमदनगर जिल्ह्यासाठी अमोल वैद्य (अकोले) यांची नियुक्ती एक वर्षासाठी झाली आहे. नवनियुक्त जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी कौतुक केले आहे.
Prev Post