जळगाव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालय येथे १४ व १५ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले होते या स्पर्धेत जळगाव विभागातील मुलांचे दहा संघ तर मुलींचे पाच संघांचा समावेश होता शनिवारी या स्पर्धेचे अंतिम सामने खेळवण्यात आले तसेच तृतीय क्रमांकासाठी स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर दिनेश पाटील ,जैन स्पोर्ट्स अकैडमी चे क्रीड़ा समन्वयक फारुख शेख ,अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ रत्ना महाजन, जळगाव विभागाचे सचिव किरण नेहते, निवड समिती सदस्य यशवंत देसले व डॉक्टर संजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉक्टर दिनेश पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले तर फारुक शेख यांनी विभागांतर्गत जळगाव विभागांनी विजय संपादन केल्यास त्यांना जैन अकॅडमी तर्फे क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात येईल असे आश्वासन दिलेउपप्राचार्य रत्ना महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास जळगाव विभागाचे सर्व क्रीडा संचालक, डॉक्टर अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालय जिमखाना समितीचे सर्व प्राध्यापक यांची उपस्थिती होती.