पुणे । दुबई येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत पुण्यातील डॉ. हरिश पाटणकर व डॉ. स्नेहल पाटणकर यांना पोस्टर प्रेझेंटेशनसाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय, सायन्स इंडिया फोरम आणि वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 11 नोव्हेंबर 2017 दरम्यान दुबई येथे ही पहिली आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आयोजित करण्यात आली होती.
डॉ. हरिश व डॉ. स्नेहल पाटणकर यांनी ‘डायग्नॉस्टिक ण्ड ट्रीटमेंट व्हॅल्यू डिशन इन आयुर्वेदिक ट्रायकॉलॉजी थ्रू टेक्नॉलॉजी’ या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन केले. दुबई विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. इसा अल मोहंमद बस्तकी यांच्या हस्ते डॉ. पाटणकर यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन संयुक्त अरब अमिरातीचे सहिष्णुता मंत्री शेख नाहायन मुबारक अल नाहायन यांच्या हस्ते झाले. यावेळी भारताचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, डॉ. राजेश कोटेचा, विद्न्यान भारतीचे सरचिटणीस ए. जयकुमार, कोईमतूर येथील द आर्य वैद्य फार्मसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. आर. कृष्णकुमार यावेळी उपस्थित होते. आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिद्धा व होमियोपॅथी या शास्त्रातील जगभरातून 2000 पेक्षा जास्त संशोधक या परिषदेत सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत या पाचही विद्याशाखातील नवनवीन संशोधने, पोस्टर्सचे सादरीकरण झाले.