आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी

0

भुसावळ । नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत देशभरातील 560 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात भुसावळ येथील पाच खेळाडू सहभागी झाले होते. त्यांना दोन रौप्य व दोन कांस्य पदक मिळाले. यामध्ये सेंट अलॉयसिस हायस्कुलचा झैद खान याने रौप्य पदक, रेल्वे हायस्कुलच्या अमन सिद्दीकी याने रौप्य पदक, के.नारखेडे विद्यालयाच्या सुदेश पाठक याने कांस्य पदक, भोळे महाविद्यालयाच्या राकेश आगरकर याने कांस्य पदक पटकावले तर जयेश गायकवाड या खेळाडूनेदेखील चांगली कामगिरी केली.

यांची होती उपस्थिती
या खेळाडूंचा किक बॉक्सिंग संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ, एनआरएमयुचे मंडळ सचिव इब्राहिम खान, दिलीप तळेकर, रुपेश गायकवाड, फिरोज खान, श्रीनिवास आगरकर, विजय साळवे, दिपक मगर, सुरेश यशोदे, राकेश बग्गन, आरिफ सिद्दीकी, रियाज खाटीक, दत्तात्रय पाठक, अजय कुचेकर, सुमेध शेजवळ, महेश तायडे, प्रसेनजित खरात, विशाल शेळके, मुकेश भोई, धनराज बाविस्कर आदी उपस्थित होते.