जळगाव : सातत्याने नावीन्याची कास धरून आपले वेगळेपण जपून ठेवणार्या ‘नवजीवन सुपरशॉप’मध्ये आज (दि.12) आंतरराष्ट्रीय कर्मचारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध विभागातील कर्मचार्यांचा सत्कार करून नवजीवन सोबत असलेल्या ऋणानुबंधाचा कौतुक सोहळा चांगलाच रंगला. यावेळी 5 सुपरशॉप व 1 मेगामार्टमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
12 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय किरकोळ विक्रीसेवा कर्मचारी दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. विश्वास आणि सचोटी या गुणांवर वर्षभर ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा देण्यात अग्रेसर असलेल्या ‘नवजीवन सुपरशॉप’मधील काही निवडक कर्मचार्यांचा एका कौटुंबिक सोहळ्यात सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ.कांचन कांकरिया यांनी केले. नवजीवनच्या सेवेत ग्राहकांसाठी सातत्याने कार्यरत असणाक्षर्या कर्मचार्यांचे कौतुक करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कौतुक सोहळ्यात नवजीवन परिवारातील तीन पिढ्यांचे साक्षीदार असलेले वसंतराव वाणी यांना नवजीवन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर इतरही कर्मचार्यांना विविध पुरस्कार देण्यात आले. कांकरीया परिवारातील झुंबरलालजी, कांतीलालजी, अनिलभाई, सुनीलभाई, सौ. सुलोचना, सौ. कंचन यांच्यासह तिसर्या पिढीतील सुमित, पूजा, शितल यांनी कर्मचार्यांचा सन्मान केला. यावेळी नवजीवन परिवारातील भागीदार पिंटूभाऊ सांखला, सुरेश ललवाणी हेही उपस्थित होते.
नवजीवनच्या कर्मचार्यांचा केला सन्मान
नवजीवनच्या कर्मचार्यांना दिलेले सन्मान असे – बेस्ट एम्प्लॉयी मॅनेजर – सायली ओवे, बेस्ट सुपर वायझर – प्रविण दायमा, जितेंद्र सातपुते, बेस्ट फ्लोअर मॅनेजर – केदार कापडणे, बेस्ट सेल्समन इन सुपर मार्केट – प्रेमचंद बेदमुथा, सुरेश पाटील, प्रितम अहिरे, बेस्ट स्लेसमन इन नॉन सुपर मार्केट पद्माकर वाणी, बेस्ट कस्टमर रिलेशन मॅनेजर – राम जोशी, बेस्ट रॅक जॉबर – राहूल जैन, कल्याणी पाटील, शोभा अथळके, राहूल कोरे, माधुरी सोनवणे, कविता पाटील, बेस्ट मावशी – कल्पना बाविस्कर, बेस्ट डिपार्टमेंट हेड – धनराज पाटील, बेस्ट पॅकर – मनोहर वाणी, बेस्ट ड्रायव्हर – माणिक महाजन, बेस्ट चेक आऊट असिस्टंट – संजय तलेरा, दिलीप पाटील, बेस्ट एक्टीव्ह पर्चेसर – कैलास भावसार, बेस्ट अकाऊंट असिस्टंट – सागर जोशी, बेस्ट सप्लायर ग्रोसरी – धनराज तलरेजा, बेस्ट सप्लायर एफएमजीसी – चंदू राजपूत, बेस्ट हेवी ड्यूटी वर्कर – अनिल जाधव, प्रविण पाटील, बेस्ट क्लिनिंग किपर – संजय सांगडणे, बेस्ट एप्रिशिएशन अवार्ड – सुरेश ललवाणी, शरद भंगाळे, विजय नागणे, महेश अहिरराव, प्रविण शिंदे, विशाल पाटील, बेस्ट वॉचमन – शरद देशमुख, बेस्ट कॅश हॅण्डलर – किशोर पाटील, बेस्ट ऑलराऊंडर – निखिल संचेती, बेस्ट पर्सन फॉर इनवर्ड – प्रशांत पाटील, बेस्ट डाटा एन्ट्री – युगेश्वरी जोशी, पद्मजा बोडस, बेस्ट कॅशियर – रोशनी तुर्कीया, महेश अमब्रिकर अशा प्रकारे 26 गटात किमान 50 जणांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवन सुपरशॉपचे संचालक अनिल कांकरीया व सौ. कंचन कांकरीया यांना आभार मानले.