आंतरराष्ट्रीय खेळाडू कांचनला जैन इरिगेशने दिली नोकरी

0

जळगाव । जलतरणमध्ये महाराष्ट्र शासनाचा एकलव्य पुरस्कार प्राप्त कांचन चौधरी हिला जैन इरिगेशनने नोकरीची संधी दिली. जैन उद्योग समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा जैन स्पोर्ट्स अकादमीचे संचालक अतुल जैन यांनी चौधरी हिला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. जैन स्पोर्ट्स् अकादमीतर्फे कांचन चौधरी हिला दत्तक घेतले होते. तिला जलतरणसाठी लागणारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, मार्गदर्शन, किट उपलब्ध करून दिले होते. तिला जैन फूड पार्कमध्ये नोकरीची संधी दिली आहे. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यामुळेच शिक्षणाची प्रेरणा मिळाल्याचेही तिने स्पष्ट केले. खेळाडू कांचन चौधरीला नियुक्तिपत्र देताना जैन फॉर्म फ्रेशचे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे. सोबत एचआर विभागाचे जी. आर. पाटील.