आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी प्रशिक्षण केंद्राची भोसरी गावठाणात उभारणी

0
पिंपरी चिंचवड : भोसरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. त्या कामासाठी स्थायी समितीने सुमारे 9 कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता दिली आहे. भोसरी गावठाणातील प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व्हे नंबर 1 मध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या केंद्राबरोबरच गावठाणात कबड्डी प्रशिक्षण केंद्रही विकसित करण्यात येणार आहे. या केंद्रासह उर्वरीत कामे करण्यासाठी 8 कोटी 86 लाख 15 हजार 916 रूपये खर्च होणार आहे. भोसरी येथे सर्व्हे क्रमांक एक मधील गावठाणाच्जया मैदानालगत हे कबड्डी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.
8 कोटी 22 लाख खर्च अपेक्षित…
या कामासाठी 8 कोटी 22 लाख 53 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 7 कोटी 96 लाख 29 हजार 515 रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. सदरच्या कामास ठेकेदाराकडून 7 कोटी 96 लाख 29 हजार 515 पेक्षा 7.99 जास्त दराने निविदा प्राप्त झालेल्या आहेत. सन 2018-19 चे एस.एस.आर. दरानूसार प्राप्त निविदा स्विकृत योग्य दरापेक्षा 6.42 टक्के कमी येत आहेत. प्राप्त निविदा मंजूर दराने म्हणजेच 8 कोटी 59 लाख 91 हजार 913 अधिक रॉयल्टी चार्जेस  24 लाख 76 हजार 353 मटेरियल, टेस्टींग चार्जेस 1 लाख 47 हजार 650 असे एकूण 8 कोटी 86 लाख 15 हजार 916 पर्यंत काम करुन घेण्यास आणि नियमानूसार व निविदेतील निविदा अटीप्रमाणे त्यावरील वस्तू व सेवा कर अदा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यापैकी बी. के. खोसे या ठेकेदाराने निविदा प्राप्त झालेली आहे.