जळगाव। कदरपुर, गुरगाव येथे झालेले दुसर्या इंडो-भुतान बीग बोअर शुटींग चॅम्पीयनशिप स्पर्धेत जळगाव जिल्हा रायफल असो.चा निनाद प्रशांत चौधरी याने चमकतदार कामगिरी करीत सांधिक रौप्य पदक पटकाविले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातून शूटींग खेळाचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक पटकाविण्याचा मान त्याने मिळवला आहे. तसेच 60 व्या राष्ट्रीय बिगबोअर शुटींग स्पर्धेतही त्याने नविन उच्चांकासह दोन सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्राची शान वाढविली आहे.
कदरपुर, गुरगाव येथे इंडो-भुतान बीग बोअर शुटींग चॅम्पीयनशिप स्पर्धा संपन्न झाली. त्यात जळगाव जिल्हा रायफल असो.चा आंतरराष्ट्रीय खेळाडू निनाद चौधरी याने भारतासाठी 300 मीटर थ्री-पोजिशन पुरुषाच्या गटात 1200 पैकी 1111 गुण पटकावित सांघीक रौप्य पदक मिळविले. तसेच गुरगाव येथे झालेल्या 60व्या बीगबोअर शुटींग स्पर्धेत 300 मीटर फ्री रायफल थ्री पोजिशन सिव्हीलीयन पुरुष गटामध्ये 1200 पैकी 1113 गुण मिळविल सुवर्ण पदक पटकाविले, या स्पर्धेत निनादने त्याचे नावावर असलेले 1112 चे रेकॉर्ड मोडित काढून 1113 हा नविन विक्रम रेकॉर्ड स्वतःचे नावावर करुन सुवर्ण पदक पटकाविले आहे. तसेच 300 मीटर स्टॅण्डर्ड रायफल थ्री पोजिशन सिव्हीलयन पुरुष गटामध्ये सुद्धा निनादने 600 पैकी 549 गुण मिळवत या स्पर्धेतील दुसरे राष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्राची शान वाढविली आहे. त्याच्या या उत्कृष्ट व कामगिरीमुळे दुसर्या इंडो-भुतान बिगबोअर शुटींग चॅम्पीयनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान त्याला मिळाला आहे.