आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू हेन्रिकेझची गोळ्या झाडून हत्या

0

पनामा । आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ऍमिल्कर हेन्रिकेझ याची कोलॉन प्रॉव्हिन्स परिसरात गोळी घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 33 वर्षीय हेन्रिकेझ आपल्या निवासस्थानातून बाहेर पडला असताना एक गनधारी इसमाने त्याच्यावर अनेक गोळया झाडल्या.

या घटनेत त्याच्याशिवाय अन्य दोन व्यक्तीची जखमी झाल्या आहेत. गोळीबार झाल्यानंतर हेन्रिकेझला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष जुआन कार्लोस व्हारेला यांनी ट्विटरवरून या हत्येची तीव्र निंदा केली असून हत्या करणार्‍याचा लवकरात लवकर शोध घेतला जाई असे सांगितले आहे. मिडफिल्डर हेन्रिकेझ हा पनामा राष्ट्रीय फुटबॉल संघाचा सदस्य असून त्यांचा संघ 2018 विश्वचषक पात्रता स्पर्धेत संघाचे ‘उच्चाटन’ टाळण्यासाठी खेळत होता. अलीकडेच अमेरिकेविरुद्धच्या लढतीत त्याने पनामाकडून शेवटच्या 20 मिनिटांत भाग घेत लढत 1-1 अशी बरोबरीत राखली होती.