जळगाव । नाशिक येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्येवर तुलनात्मक बहुभाषी साहित्य संगोष्टी “ब्रह्मा व्हली” महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झाला. या दोन दिवशीय संगोष्टीमध्ये हिंदी गुजराथी, उर्दु, मराठी, इंग्रजी, जपानी आदी भाषांचा विविध भाषा तज्ज्ञकडून संबंधितांनी भाषाचा जगात महत्त्व व भाषामुळे विश्व पातळीवर आपण मानवता व आपली संस्कृती व आपले देशाची प्रगती कशी होते व होऊ शकते. याबद्दल अनेक वक्तांनी विविध संत्रामध्ये आपले विचार व्यक्त केले. उर्दु भाषेचे सत्रात जळगावचे काझी रफीकोद्दीन यांनी उर्दु भाषाचा महत्त्व सांगितले.
सत्राचे अध्यक्ष म्हणून जळगावच्या इकरा शिक्षण संस्थेचे प्रमुख डॉ. अ.करीम सालार प्रमुख पाहुणे म्हणून हाजी अ. मजीद झकेरिया उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रो. निकहत परवीन नाशिक यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणमध्ये डॉ. अ.करीम सालार यांनी सांगितले की, उर्दु भाषा ही फक्त मुस्लिमांची भाषा नाही तर या भाषेचे अनेक बिगर मुस्लिम महान कवी व कथाकार होऊन गेले आहे. ही भाषा भारतात जन्मली व इथेच त्याची प्रगती झाली. पाकिस्तान ची राष्ट्रभाषा जरी उर्दु असली तरी उर्दुचे खरे स्थान हे भारतात आहे. उर्दु भाषेचे रघुपती सहाय्य गोरखपूरी, (फिराक गोरखपूरी) क्रिष्ण बिहारी नुर, क्रिष्ण चंद्र व्यतिरिक्त शेकडो साहित्यीक हे बिगर मुस्लिम होते.