आंतरराष्ट्रीय भजन गायक अजय पाठकाची कुटुंबीयांसह हत्या !

0

लखनौ: आंतरराष्ट्रीय भजन गायक अजय पाठक आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील शामली येथे पाठक यांच्या राहत्या घरी हे हत्याकांड घडले आहे. यामध्ये अजय पाठक यांच्यासह त्यांची पत्नी स्नेहा पाठक, मुलगी वसुंधरा पाठक आणि मुलगा भागवत पाठक यांची हत्या करण्यात आली.

अजय पाठक हे काल सकाळी संपूर्ण कुटुंबासह कर्नाला येथे एका कार्यक्रमासाठी जाणार होते. त्यामुळे सकाळपासून त्यांच्या घराला टाळे लागलेले होते. मात्र संध्याकाळी कुटुंबीयांनी त्यांना फोन केला असता फोन लागला नाही. तसेच त्यांची गाडीही गायब होती. त्यामुळे शंका आल्याने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी घराचे टाळे तोडले. त्यावेळी तिघांचेही मृतदेह आतमध्ये पडलेले होते. तसेच त्यांचा मुलगा भागवत हा बेपत्ता होता. नंतर त्याचाही मृतदेह सापडला.

घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. हा आरोपी अजय पाठक यांच्या मुलाचा मृतदेह आणि गाडीला आग लावण्याचा प्रयत्न करत होता. हिमांशू असे त्याचे नाव असून, पाठक यांच्या मुलाचा मृतदेह आणि गाडीला आग लावण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.