आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन

0

जळगाव। मू.जे. महाविद्यालयातील सोहंम डिपार्टमेंट ऑफ योग अ‍ॅण्ड नॅचरोपॅथी विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निःशुल्क योग व निसर्गोपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

जळगाव जिल्ह्यात निसर्गोपचाराच्या प्रसार व प्रचाराच्या उद्देशाने घेतलेल्या या शिबिरांमध्ये चुंबक व अक्युप्रेशर चिकित्सा तसेच स्वास्थ्य टिकविण्याच्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. मू.जे. महाविद्यालय, गुरुनानक हॉल, गणपती नगर, नील सदन- साने गुरुजी कॉलनी, गणपती मंदिर – प्रेम नगर, हनुमान मंदिर – एस.एम.आय.टी. कॉलेज, वीतराग भवन, लाल मंदिर, वाघ नगर या शहरातील परिसरासह बोथरा मंगल कार्यालय चोपडा येथे हे शिबीर झाले. मू.जे. महाविद्यालय, जळगाव येथे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी व माधवबाग यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.