आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

0

नंदुरबार । येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये जागतिक योग दिनानिमित्त जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्पर्धेत 118 योगापटूंनी सहभाग नोंदविला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय नंदुरबार व नंदुरबार जिल्हा योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्या सुषमा शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, मुख्याध्यापिका शाह मॅडम, योगा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, तालुका क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे, मिलिंद वेरुळकर, योग शिक्षक सी.एन.पाटील, प्रा.सुनिल पाटील, टेनिक्वाईट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज पाठक, श्रीराम मोडक, राजेश शहा, दिनेश ओझा, स्पर्धा संयोजक प्रा.मयुर ठाकरे, राकेश माळी, जितेंद्र पगारे, शांताराम मंडाले आदी उपस्थित होते.

योगाचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनण्य साधारण महत्त्व
नंदुरबार । 49 महाराष्ट्र बटालियनतर्फे नंदुरबार येथील एकलव्य विद्यालय, डी.आर.हायस्कुल व जी.टी.पाटील महाविद्यालयातील छात्रसैनिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.21 जून 2017 आंतरराष्ट्रीय योग दिवस एकलव्य विद्यालय मैदानावर साजरा करण्यात आला. योगाचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनण्य साधारण महत्त्व आहे. योगामुळे व्यक्तीमत्त्व विकास, शारिरीक बळकटी, स्वस्थ तसेच विविध आजारांपासून निवारण व आत्मविश्‍वास वृद्धी असे अनेक फायदे आपणांस अनुभवावयास येतात. 21 जून हा योग दिवस म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत विविध योगासनांचे ङ्गायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा दिवस आयोजित केला जातो.नंदुरबार येथील छात्रसैनिकांसाठी योग दिवस आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पं.खा.भि.सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास नटावदकर उपस्थित होते. एकुण 151 छात्रसैनिकांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला. योग मार्गदर्शक म्हणून प्रा.एस.ए.पाटील यांनी काम पाहिले. सोप्या व सरळ भाषेत त्यांनी विविध योगासनांचे महत्त्व समजवत मार्गदर्शन केले. अनुलोम-विलोम, भस्रीका, कपालभाती, वज्रासन, शिर्षासन, सुर्य नमस्कार असे महत्त्वाचे आसनांबद्दल सहभागींना प्रेरित करण्यात आले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी विलास वाघ, राहुल पाटील, डॉ.विजय चौधरी यांनी परिश्रम घेतले.