आंतरराष्ट्रीय वर्ल्ड फायर फायटर गेममध्ये जीवन पाटील यांना ब्राँझ मेडल

0

रावेर- आंतरराष्ट्रीय वर्ल्ड फायर फायटर गेममध्ये जीवन उमाकांत पाटील याने ब्राँझ पदकावर आपले नाव कोरले. चिंजु (दक्षिण कोरीया) येथे वर्ल्ड फायरफायटर 2018 गेमचे आयोजन करण्यात आले. त्यात मुंबई महानगरपालिकेचा अग्निशामक दलाचा जवान जीवन पाटील याने रीले चार बाय शंभर या प्रकारात भाग घेतला. यात त्याला ब्राँझ मेडल मिळाला. जीवन पाटील हे अजंदे, ता.रावेर येथील रहिवासी असून डॉ.उमाकांत पाटील यांचे ते चिरंजव तर अशोक पाटील सुरेश पाटील यांचे पुतणे आहेत.