आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेत लेखा विभाग चॅम्पियनशिपचा मानकरी

0

नवी मुंबई । महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या सुप्त क्रीडा व कला गुणांना वाव मिळावा यादृष्टीने आयोजित करण्यात येत असलेल्या महानगरपालिका आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत लेखा विभागाने जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान पटकावला. यावेळी बोलताना स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील यांनी अशा क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांमुळे दैनंदिन रूटीनपेक्षा वेगळ्या वातावरणामुळे अधिकारी, कर्मचारी यांचा कामातील उत्साह वाढेल, असा विश्‍वास व्यक्त केला.नगरसेवक, पत्रकार, अधिकारी यांच्या तीन संघातील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यांमध्ये नगरसेवक संघाने विजेतेपद पटकाविलेले असून, अधिकारी संघ उपविजेता ठरलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून गणेश पाटील, अधिकारी संघ आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सोमनाथ वास्कर, नगरसेवक संघ यांना स्मृतीचिन्हे प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

सुपर वूमन स्पर्धेत रंजना धानके विजेत्या
यानिमित्ताने घेण्यात आलेल्या महिला अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी घेण्यात आलेल्या सुपर वुमन स्पर्धेत शहर अभियंता विभागातील अधिक्षक रंजना धानके या विजेत्या ठरल्या. लेखा विभागील विद्या चव्हाण यांनी उपविजेतेपद तसेच सार्व. रूग्णालय वाशी येथील शारदा बनसोडे, मिनाक्षी जाधव, इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्रतिक्षा बिलकुले यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात परिवहन विभागाने प्रथम क्रमांक पटकावलेला असून, सी विभाग, वाशी उपविजेता ठरलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून यतिन भोईर परिवहन विभाग, उत्कृष्ट गोलंदाज निलेश शेलार सी विभाग वाशी यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कंत्राटी कामगार क्रिकेट स्पर्धेत शिक्षण विभागाने विजेतेपद, बी विभाग नेरुळ यांनी उपविजेतेपद तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून नितेश म्हात्रे शिक्षण विभाग आणि उत्कृष्ट फलंदाज कपिल बी विभाग नेरुळ यांना सन्मानीत करण्यात आले.