आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघ विजयी

0

जळगाव। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव जिल्हा फुटबॉल असो. आयोजित आंतर शालेय फुटबॉल 19 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर झाला.

मुलींच्या संघात फक्त राष्ट्रीय विद्यालय चाळीसगावचा संघ सहभागी असल्याने त्यांना विजयी घोषीत करुन त्यांनी सुवर्ण पदके देण्यात आली. विभागीय स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला. मुलांचे 5 संघ उपस्थित होते. त्यात अंतिम सामना डी.एल. हिंदी स्कूल, भुसावळविरुध्द ललवाणी कॉलेज जामनेर यांच्यात झाला असता एकतर्फी विजय भुसावळने मिळविला. त्यांनी जामनेर वर 5-0 ने आघाडी घेतली. उपविजयी खेळाडूंना शिक्षण अधिकारी प्रा. बि.जे. पाटील विस्तार अधि. खलील शेख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ओबीसीसेल सविता बोरसे, फुटबॉल असो. फारुक शेख व क्रीडा अधिकारी एम.के. पाटील यांच्या हस्ते सुवर्ण रजत पदके देण्यात आली.