भुसावळ : समाजात मोठ्या प्रमाणावर पोटजाती असून यामुळे समाजाचा विकास खुटूंन तरुण पिढीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते पर्यायाने समाज आणखी मागे फेकला जावून विकासाला वाव मिळत नसल्यामुळे समाजातील आंतरपोटजातीतील भेद मिटवून रोटी बेटी विवाहसंबंध जोडले पाहिजेत विवाहातील चुकीच्या प्रथांना फाटा देवून साधेपणाने विवाह करण्याचे आवाहन जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी केले. कोळी समाज विकास मंडळ आयोजित राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. येथील संत गजानन महराज नगरातील कोळी समाज मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. याप्रसंगी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शहिद कोळींना श्रध्दांजली
यावेळी सांगली जिल्ह्यातील शहिद जवान नितीन कोळी यांना श्रध्दांजली अर्पित करण्यात येऊन त्यांच्या परिवाराला 11 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. शंकररराव मामीलवीाड यांनी कोळी समाज विकास मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली. सतिष सपकाळे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. चंद्रकांत सपकाळे यांनी मंडळाच्या वेबसाईटबद्दल माहिती दिली. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष नितीन सोनवणे, सचिव वसंत सपकाळे, वधू-वर मंडळाचे अध्यक्ष रोहिदास सोनवणे, महारु कोळी, लिलाधर सपकाळे, उपाध्यक्ष भागवत सपकाळे, दत्तात्रय सपकाळे, दिपक सोनवणे, विकास सपकाळे, उत्तम कोळी, अभिमन्यू सोनवणे, रविंद्र बाविस्कर, प्रदिप सपकाळे, लखिचंद बाविस्कर, बाळू कोळी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास मान्यवरांची होती उपस्थित
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत सपकाळे होते. तर शंकरराव मामीलवाड, सिताराम देवराज, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, सतिष सपकाळे, डॉ. दिवाकर पाटील, विनोद सोनवणे, वधू-वर परिचय मंडळ अध्यक्ष रोहिदास सोनवणे, कोळी समाज मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे उपस्थित होते.
प्रास्तविक राज्यस्तरीय कोळी समाज वधूवर परिचय मंडळाचे अध्यक्ष रोहिदास सोनवणे यांनी केले. व मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
चुकीच्या परंपरा बंद करा
यावेळी प्रभाकर सोनवणे यांनी मनोगतात सांगितले की, समाजातील आंतरपोटजातीतील भेद मिटवून रोटी बेटी विवाहसंबंध जोडले पाहिजेत विवाहातील चुकीच्या प्रथा परंपरा बंद केल्या पाहिजेत. लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर अनाठायी खर्च केला जात असून हाच खर्च समाजात चांगल्या कार्यासाठी वापरल्यास त्याचा सदुपयोग होईल व समाजाच्या विकासाला देखील हातभार लागेल. त्यामुळे अशा खर्चांना फाटा देवून लग्नाच्या बस्त्यासाठी दोन्ही पक्षाकडील नातलग गोळा करुन बाजार केला जातो. यात वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.