आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

0

जामनेर – आंतरमहाविद्यालयीन व्हॉलिबॉल, बुध्दीबळ व कुस्ती स्पर्धेत येथील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन यश मिळवीले. जळगांव येथील एच.जे.थीम महाविद्यालयात झालेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत हितेश पाटील, वैभव माळी व सागर फिरके यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. आयएमआर महाविद्यालयात झालेल्या बुध्दीबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सर्व स्तरातून केले अभिनंदन
शेंदुर्णी महाविद्यालयात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या कुस्ती स्पर्धेत मोसीम शेख, राहुल काळे, गौरव चौधरी व प्रशांत पाटील यांची निवड झाली. मोसीम शेख याची विद्यापीठस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ.व्ही.व्ही.भास्कर व क्रिडा शिक्षक प्रा.नवनीत आसी यांनी त्यांचे अभिनंदन केले.