आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची आढळराव पाटील यांनी घेतली भेट

0

यवत । कानगाव येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी भेट दिली. दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकरी विविध 11 मागण्यांसाठी गुरुवार (दि.2) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. येथील संपकरी शेतकर्‍यांना शिरूरचे खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांनी कानगाव येथे येऊन भेट दिली. संपकरी शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आढळराव पाटील यांना सादर केले. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार रमेश थोरात, दौंड तालुका शिवसेना प्रमुख शरदचंद्र सुर्यवंशी, जयश्री पलांडे, अनिल काशीद आदी मान्यवर व संपकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकर्‍यांना फसवी कर्जमाफी
आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना गांभीर्य नाही. मराठा मोर्चासारखी परिस्थिती येऊ देऊ नये, असे आढाळराव पाटील यांनी सांगितले. संपकरी शेतकर्‍यांच्या मागण्यांची तड लागल्याशिवाय माघार घेऊ नये. शेतकरी आंदोलनाचा प्रश्‍न लोकसभेत उपस्थित करून योग्य प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफीचे दिलेले प्रमाणपत्र हे फसवे असल्याची टीका आढळराव पाटील यांनी यावेळी केली.