जळगाव। आघाडी सरकारच्या काळात 60 हजार कोटी सिंचनावर खर्च करण्यात आल्याची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. मात्र यामुळे सिंचनात 1 टक्का देखील वाढ झाली नसल्याची टीका चव्हाण यांनी भाजप सरकारवर केली. पैसे खर्च करून देखील त्यांनी सिंचन वाढविले नाही. आम्हाला एवढे पैसे मिळाले असते तर आम्ही राज्यातील जमीन सिंचनाखाली वाढवली असती मात्र ते अयशस्वी ठरले त्यामुळे शेतकर्याच्या संपात सहभागी होण्याचा विरोधकांना नैतिक अधिकार नसल्याची टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी तत्कालीन आघाडी सरकावर केली आहे. जळगाव दौर्यावर असताना भाजपच्या वसंत स्मृती जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
पाकीस्तानचे हाल होणार: गेल्या काळात काश्मीर मध्ये तरुणांचे दगडफेकिचे प्रमाण वाढले. पैशाचे आमिष दाखून त्यांच्या कडून हिंसक कार्य करून घेतले जात होते. मात्र त्यावर पूर्णपणे अंकुश मिळवण्यात यश आले. टीव्हीवर मोठा बातम्या करून दाखविल्या जातात, त्यामुळे अनेक वेळा परिस्थिती बिघडत असल्याने याला मिडिया देखील जबाबदार असून काश्मीर दौर्यावर असताना पाहणी केली असता पूर्णपणे शांतता आहे. पाकिस्तानच्या लष्कर व राजकारणात समेट नसल्याने नेतृत्व करणार्यास अडचण आहे. यामुळे पाकिस्तानचे नेहमी हाल होत राहणार असल्याचे व्यक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले आहे.
कुलभूषण जाधवला फसविले
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना चुकीच्या पद्धतीने फसविले असून अंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची भक्कम बाजू मांडण्यात आली. पाकिस्तान त्यांची बाजू मांडताना कमी असून कुलभूषण जाधव यांच्या फाशीची शिक्षा वाचवण्यात आम्हाला यश आले आहे. त्यांना देखील भारतात परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती ना.सुभाष भामरे यांनी दिली, पाकिस्तान भारताचे काहीही बिघडत नसल्याचा दावा देखील ते यावेळी करतांना विसरले नाही.
संकट आल्यास लष्कर सक्षम
केंद्रीय संरक्षण खात्यात मोठे बदल होत आहे. पाकिस्तानचे षडयंत्र सुरुच राहणार असून सीमेवर कोणतेही संकट आल्यास लष्करातील सैनिक सक्षम आहे. मोदी सरकारच्या काळात संरक्षण खात्यांत अमुल्य बदल झाले आहे. सन्मानाची वागणूक जवानांना दिली जात असल्याने देशात चांगले वातावरण निर्माण झाले. मेक इन इंडियाच्या माध्यमातून पैसा भारतात आण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने सुरु आहे.