मुंबई: मराठा समाजातील विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकर्त्यांची भेट घेतली आहे. आंदोलनकार्त्यांशी खासदार सुळे यांनी चर्चा केली. सरकार आंदोलनावर योग्य मार्ग काढणार आहे असे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांची समजूत काढली. दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आज दुपारी ४.३० वाजता मंत्रालयात बैठक घेणार असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.