कुर्नुल (वि.प्र.) । जैन उद्योग समूहाच्या पुढाकाराने (आंध्रप्रदेश) येथे दि.21 जून रोजी जैन हायटेक ग्री पार्क व जैन फूडपार्कचे भूमिपूजन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प लवकरच येथील शेतकर्यांना कृषी विकासासह आर्थिक प्रगतीचा नवा मंत्र देईल असे सांगत नायडू यांनी ‘जैन’च्या कामाची प्रशंसा केली.
जळगावातील जैन उद्योग समूहाने जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात नेत्रदीपक काम केले आहे. आंध्रप्रदेशातील शेतकर्यांना हे उच्च कृषी तंत्रज्ञान इथेच उपलब्ध व्हावे यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्यावतीने जैन इरिगेशनला आमंत्रित केले आहे. आज भूमिपुजन झालेला हा प्रकल्प लवकरच येथील शेतकर्यांना कृषी विकासासह आर्थिक प्रगतीचा नवा मंत्र देईल. असे प्रतिपादन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, जैन फार्म फ्रेश फूड लिमिटेडचे चेअरमन अनिल जैन, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री के.ई. कृष्णमुर्ती, फूड प्रोसेसिंग मंत्री अमरनाथ रेड्डी, मानव संसाधन व पालक मंत्री (अनंतपूर) के श्रीनिवासन, कर्नुलचे जिल्हाधिकारी सत्यनायराण, कर्नुलचे आमदार ऐ. दैय्या उपस्थित होते.
नायडूंनी केली पाहणी
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हायटेक ग्रीपार्क व जैन फूडपार्कच्या कोनशिलेचे अनावरण, भूमिपूजन केले. त्यानंतर जैन उ्दयोग समूहाच्या विकासाचे विविध टप्पे दर्शविणार्या टिश्यूकल्चर, ठिबक सिंचन आदी बाबींची माहिती असलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. मुख्यमंत्री नायडू यांनी कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्र समजून घेऊन त्यावर चर्चा केली.