आंबळे ग्रुप ग्रामपंचायतीस 23 लाखांचा निधी

0
खाणउद्योग संघाने जपली सामाजिक बांधिलकी 
तळेगाव दाभाडे : वडगाव मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघ यांच्यावतीने आंबळे ग्रुप ग्रामपंचायतीस 23 लक्ष रूपये एवढा निधी गावांच्या पायाभूत सुविधा,विकासाकरीता व उभारण्यासाठी आमदार बाळा भेगडे  यांचे हस्ते देण्यात आला. या ग्रामपंचायतीमध्ये आंबळे, मंगरूळ, कदमवाडी यांचा समावेश आहे. क्रशर उद्योजकांनी गावाप्रती सामाजिक बांधिलकी जपत आंबी ते खराळ ओढा आंबळे सुमारे 4.4 की.मी. लांबीचा रस्ता 4.5 कोटी रुपये खर्च करून तीन वर्षांपुर्वी बनविलेला आहे. शिवाय सदर ग्रामपंचायत हद्दीत असणारी शैक्षणिक इमारत उभारणे, शैक्षणिक साहित्य देणे, गाव मंदीरे यांच्या उभारणीस भरघोस मदत करणे अशी व अनेक समाजोपयोगी कामे  या परिसरातील क्रशर उद्योजक करत आहेत. या कार्यक्रमास आमदार संजय (बाळा) भेगडे व संघटनेचे अध्यक्ष विलास काळोखे यांच्या हस्ते निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपसभापती शांताराम कदम, सरपंच मोहन घोलप आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंचांनी शासनाकडून जास्तीत जास्त गौणखनिज निधी आमच्या ग्रामपंचायतीस मिळविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन शांताराम कदम यांनी दिले. विलास काळोखे यांनी क्रशर उद्योजक नेहमीच ग्रामपंचायतीसाठी मदत करतात निधी उपलब्ध करून देतात, या कामासाठी कटीबद्ध असु, असे मत व्यक्त केले. प्रस्ताविक मोहन घोलप यांनी केली.