आंबी येथे भैरवनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा

0

तळेगाव : मावळ तालुक्यातील आंबी येथे शुक्रवारी श्री भैरवनाथ मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. यानिमित्त आयोजित मिरवणूक, पुण्याहवाचन, होमहवन, मंडपपूजन, वास्तूशांती विधी या धार्मिक कार्यक्रमांना परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत लाभ घेतला. कलश पूजन हभप शंकर महाराज मराठे यांचे हस्ते करण्यात आले. स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस ) वारंगवाडी यांच्या शुभ हस्ते कलशारोहण करण्यात आले. तर महाआरती एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या हस्ते झाली. तर मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा रांका डेव्हलपर्सचे धीरज रांका व अभिनेत्री आशा नेगी यांच्या हस्ते पार पडले. हभप पारस महाराज मुथा (अहमदनगर) यांची कीर्तनसेवा झाल्यानंतर महाप्रसाद व नंतर सामुदायिक हरिजागर करण्यात आला.