चाकण : टाळ, मृदंग व ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात आंबेठाण (ता.खेड) येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला. आठ दिवसाच्या या सप्ताहात काकड आरती, प्रवचन, कीर्तन व हरिजागर अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ह.भ.प. ज्ञानेशकन्या अर्चना गिरी, गणेश शिंदे, संतोष कावळे, उमेश पुरी, सुप्रिया ठाकुर-साठे यांचे कीर्तन तसेच रामनवमीच्या दिवशी ह.भ.प.भालचंद्र महाराज शेळके यांचे रामजन्माचे कीर्तन होणार आहे. 5 एप्रिल रोजी महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार विजेत्या ह.भ.प.अश्विनीताई म्हात्रे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होईल. सप्ताह कालावधीत उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
यांचे परिश्रम
आयोजन श्रीराम तरूण मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ व सरपंच दत्ता मांडेकर, माजी सरपंच अशोक मांडेकर, शिवसेना तालुका संघटक सुभाष मांडेकर, कृउबाचे माजी सभापती दत्तात्रय भेगडे, ग्रा.पं. सदस्य गणेश मांडेकर, काळुराम मांडेकर, रतनशेठ मांडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष शरद मांडेकर, दत्तात्रय चव्हाण, दिलीप नाईकनवरे, गोविंद घाटे, चंद्रकांत चव्हाण, सुरेश मोहिते, माणिक दवणे, बबनराव घाटे, पोलिसपाटील संतोष मांडेकर व ह.भ.प. आनंदराव घाटे, महादू बरबटे, कुंडलिक मांडेकर, तुकाराम भेगडे, किसन लोंढे, प्रविण मांडेकर, बाळासाहेब घाटे, हनुमंत मांडेकर विठ्ठल मांडेकर व मनोहरपंत कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.