जळगाव । जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील रिक्षा चालक तरूणाने रविवारी रात्री घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रिक्षा चालक आधार रामदास बाविस्कर (वय 34) हा त्याची पत्नी, मुलगा कृष्णा (वय 5) आणि मुलगी राणी (वय 8) यांच्या सोबत डॉ. आंबेडकरनगरात राहत होता. सोमवारी सकाळी त्याची पत्नी पाणी भरण्यासाठी उठली. त्यावेळी आधार बाविस्कर घरातील छताला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर बाजुला लोखंडी मुसळ पडलेली होती. त्याने अगोदर मुसळने डोक्यावर वार करून त्यानंतर गळफास घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या डोक्यावर जखमा होत्या. रक्तभंबाळ अवस्थेत त्याने गळफास घेतलेला होता. पत्नीने समोरचे चित्र बघून आरडा ओरड केली. त्यावेळी नगरसेवक कमलाकर बनसोडे तसेच आजुबाजुचे नागरीक त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी तत्काळ आधारला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी आपतकालीन वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.