जळगाव। महू (मध्यप्रदेश) येथे विद्यापीठात आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शनासाठी आलेल्या भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचेवर मध्यप्रदेशात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा जिल्हा भारिप बहुजन महासंघाने निषेध व्यक्त केला असून हल्लेखोर गुन्हे नोंदवून अॅड. आंबेडकर यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
जशास तसे उत्तर देण्याचा इशारा..
अॅड. आंबेडकर यांचेवर झालेला हल्ला भारिपचे कार्यकर्ते जसास तसे उत्तरदेणेस तयार असल्याचे निवेदनात म्हटले आहेत. तसेच समाजातील शांतता अबाधित ठेवायची असेल तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांचेवर हल्ला करणार्या भाजप व संघाच्या गाव गुंडांना तातडीने अटक करुन विनाविलंब अॅड. प्रकाश आंबेडकर यांना झेडप्लस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, गमीर शेख, भारत ससाणे, दिनेश इखारे, किरण नन्नवरे, दत्तूदादा तायडे, दीपक बाविस्कर, मजीद जहाँगिर, आत्माराम अहिरे, हरिष अंभुरे, सचिन बार्हे, बाळू शिरतुरे, काशिनाथ गायकवाड, शिवाजी टेंभुर्णीकर, संजय कांडेलकर, प्रमोद बावस्कर, महेंद्र सुरळकर, अशोक बाविस्कर उपस्थित होते.