आंबेडकर चौकात विधवा महिलेच्या घरात दिव्याने अचानक आग

0

अक्कलकुवा । शहरातील आंबेडकर चौकात एका विधवा महिलेच्या घराला रात्रीच्या सुमारास पणतीच्या दिव्याने अचानक आग लागली असून या आगीत 40 हजार रोख व संसारउपयोगी साहित्य सुमारे अडीच लाखांचे ऐवज जळून खाक झाले आहे. याबाबत अक्कलकुवा पोलिसात अग्नि उपद्रवाची नोंद दाखल करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, रंजनाबाई राजेंद्र साठवे (वय 44) रा. आंबेडकर चौक अक्कलकुवा या विधवा महिलेच्या घराला शनिवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास अचानक पणतीने पेट घेऊन घरातील कपाटात ठेवलेले 40 हजार रोख व अन्नधान्य, भांडे, तसेच इतर जीवनावश्यक वस्तू या जळून खाक झाल्या. घरातील झोपलेले मंडळींपैकी मुलगी सपना राजेंद्र साळवे व मथुराबाई बंडू साळवे हे दोघे झोपले होते. घराला अचानक आग लागल्याचे पाहून आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करून घरातून पळ काढून आपला जीव वाचवला. सदर घरातील महिला बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने हा प्रकार घडला. याबाबत अक्कलकुवा पोलिसात रंजनाबाई राजेंद्र साळवे यांच्या खबरीवरून अग्नि उपद्रवाची नोंद कण्यात आली असून महसूल विभागाच्या पंचनामानुसार सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.