आंबेडकर विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापकासह शिपायाचे निलंबन

0

भुसावळ । तालुक्यातील कंडारी येथील सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्याची परवानगी माध्यमिक जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी 17 रोजी संस्थेचे अध्यक्ष पी.एस. सोनवणे यांना दिली आहे.आंबेडकर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक सुभाष चौधरी व माजी मुख्याध्यापक सत्यभान पंढरीनाथ सपकाळे यांनी संगनमताने शालेय वेतनेतर अनुदानाचा व्यक्तिगत नावाने व बनावट ठराव करुन बँक ऑफ इंडीया येथे बॅक खाते उघडून 3 लाख 73 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाल्यावर त्यांचे विरूद्ध न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासाठी खटला दाखल करण्यात आला आहे. यानुसार प्रभारी मुख्याध्यापक सुभाष चौधरी यांचे विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच शिपाई आनंदा त्र्यंबक सपकाळे यांस मुख्याध्यापकांनी शाळेतील सुरक्षिततेसाठी नाईट वॉचमन म्हणून नियुक्ती केली होती. त्याच्या रात्रपाळीच्या वेळेस शालेय वस्तू व साधने चोरीस जाण्याचे प्रमाण अधिक आहे. वारंवार होणार्‍या चोरीच्या प्रकारामुळे त्याच्यावर कर्तव्यात कसूर केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.