मुंबई: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक सरकार उभारणार आहे. या स्मारकाची उंची वाढविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतले आहे. १०० फुटाणे ही उंची वाढविण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. २५० फुटावरून ही उंची ३५० फुटापर्यंत वाढविण्यात येणार आहे. आज बुधवारी १५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षात हे स्मारक पूर्ण करण्याचे प्रयत्न असून स्मारकासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू देणार नाही असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
स्मारकाचे काम लवकरच सुरु होणार आहे. स्मारकासाठी आवश्यक परवानगी घेण्यात येत आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.