आंबे शिवारातून 36 लाखांच्या विदेशी मद्य जप्तीची कारवाई

0

शिरपूर । तालुक्यातील आंबे शिवारातील खड्डा पाडा येथील डोंगराच्या पायथ्याशी नाल्याकिनारी तब्बल 36 लाख 40 हजार रूपये किमतीचे विदेशी मद्य धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे. मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार अधिक्षक मनोहर आंचुळे राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली एम एन कावळे,धुळे डी.एम.चकोर निरीक्षक शिरपूर,व्ही बी पवार,डी.एस.पोरजे,अनिल बिडकर,एल.एम.धनगर,एस.टी भामरे, अनिल निकुंभे,किरण वराडे,अमोद भडांगे ,प्रशांत बोरसे, भालचंद्र वाघ,कपील ठाकुर, विजय नाहीदे, निलेश मोरे यांच्या पथकाने दि.5 रोजी शिरपूर तालुक्यातील आंबे शिवारात खड्डा पाडा येथे नाल्याकिनारी विदेशी दारूच्या कारखान्यावर धाड टाकली असता, 200 लिटर क्षमतेचे 40 ड्रम विदेशी मद्याने भरलेले ड्रम ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 36 लाख 40 हजार रूपये किमतीचे मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.