आइपीएल 10 मध्ये लुईसची खरेदीच नाही

0

किंग्जस्टन । वेस्ट इेडिजच्या विरुद्ध एकमात्र खेळल्या गेलेल्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजच्या एकतर्फी विजयात इविन लुईस याने जबरदस्त खेळी खेळली होती. लुईसने 62 बॉलवर नॉटआऊट 125 रन काढून सर्वांचा धुव्वा उडवला होता. या खेळीवर तो टी-20 इंटरनँशनल इनिंगमध्ये सर्वात जास्त रन बनवणारा जगातील तिसरा बॅट्समन आहे, तरीही यावर्षी झालेल्या आयपीएल – 10 मध्ये लुईसची खरेदी कुणीही केली नाही.

लुईसची कारकीर्द
ही लुईसच्या टी 20 करियरची दुसरी सेन्चुरी होती. पहिली सेन्चुरीसुद्धा लुईसने भारताच्या विरोधाच मारली होती. जर त्याने भारताच्या विरोधात सेन्चुरी मारली नसती तर त्याचे क्रिकेटचे करियर धोक्यात आले असते. 2016 मध्ये वेस्ट इंडिज बोर्डाने फाईनेसच्या समस्येशी झगडणार्‍या लुईसला काढून टाकण्यात आले होते. बोर्डाने धमकी दिली होती की, त्याने जर चांगली खेळी खेळून दाखवली नाही तर त्याला कायमचे बाहेर काढण्यात येईल. त्यानंतर लुईसने 27 ऑगस्ट 2016 मध्ये भारताच्या विरोधात टी-20 मध्ये मात्र 49 बॉलवर 100 धावा काढून एक तुफानी खेळी खेळली.