चिंचवड : स्तनपानाबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत. मात्र, त्याबाबत महिलांनी कोणतीही शंका ठेऊ नये. अनेकदा मूल जन्माला आल्यानंतर महिला भुकटी पाजतात. मात्र, ती पाजू नये. त्यामुळे मुलांना खूप त्रास होतो. पहिले सहा महिने बाळाला आईचे दूधच आवश्यक आहे. त्यात पौष्टिक घटत असतात. ते जंतुनाशक असल्याने बाळाला कोणताही त्रास होत नाही. आईचे दूध पचण्यास हलके असते. त्यामुळे त्यांची आकलनशक्ती वाढते, अशी माहिती ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूर्वा कुलकर्णी यांनी दिली. जागतिक स्तनपान दिनानिमित्त पिंपरीतील विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पात महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होत्या.
विविध बाबींसंदर्भात मार्गदर्शन
एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. पिंपरी इनरव्हील क्लबच्या पदाधिकार्यांनी यावेळी महिलांना विविध भेटवस्तू देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिलावर्गाची मोठी उपस्थिती होती. स्तनपान, आई व बाळाचा आहार, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, अशा विविध बाबींसंदर्भात डॉ. पूजा कुलकर्णी व डॉ. सायली कुलकर्णी यांनी सखोल मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा संगीता देशपांडे, सचिव वैशाली शहा, खजिनदार मनिषा समर्थ, स्नेहा रणदिवे, मधु बावजा, अनू सुद, सुनीता कुलकर्णी, अनंदिता तुपे, अंगणवाडी मुख्य सेविका सुनंदा धस आणि शर्वर मंचरकर उपस्थित होत्या. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूर्वा कुलकर्णी आणि डॉ. सायली कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.