आईच्या अंत्यसंस्काराला जात असतांना भीषण अपघात; पत्नी व मुलगा ठार !

0

कोल्हापूर : आईच्या अंत्यसंस्काराला पत्नी आणि मुलांसह जाताना झालेल्या अपघातात पत्नी आणि मुलगा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील गावठाणमध्ये ही घटना घडली. गावठाणमधील मारुती नांदवडेकर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

अल्टो कार झाडावर आदळून हा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोहम आणि वासंती नांदवडेकर असे ठार झालेल्या मुलगा आणि आईचे नाव आहे. पुण्याहून नांदवडेकर कुटुंब गावी जात असताना हा अपघात झाला. गडहिंग्लज तालुक्यातील हरळी गावाजवळ अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.