नवी दिल्ली । मलेशियाचा ली चोंग वेई हा जगातील नंबर वन बॅडमिंटनपटू आहे.मात्र त्याला लहानपणी बॅडमिंटन कधील आवड नसे, त्याला बास्केट बॉल खेळायला आवडत असे आणि तो खेळायचा.मात्र एके दिवशी भर उन्हात बराच वेळ बास्केटबॉल खेळत होता.आऊटडोअर कोर्टावर ते ही बास्केटबॉल खेळणे त्याच्या आईला पसंद नव्हते.त्यामुळे एकेदिवशी आईने त्याला बास्केटबॉल खेळण्यास बंदी घातली.त्यानंतर वडिलांना हाती बॅडमिंटनचे रॉकेट दिले ते आज ही त्याच्या हातात असे तो म्हणतो.तो जरी आज जगातील नंबर खेळाडू असला तरी ईतका नम्र आहे की त्याच्यामुळे कोणाला त्रास झाला तर त्याची माफी मागण्यास त्याला कमीपणा वाटत नाही.
बास्केट बॉल खेळण्यास थांबविल्याने बॅडमिंटनकडे वळलो
मलेशियाचा ली चोंग वेईचा जन्म 21 ऑक्टोबर 1981 रोजी झाला.वेईची पहिली पसंत बॅडमिंटन नव्हते. लिनला बालवणी पियानो शिकायचे होत.बालपणी बास्केटबॉल खूप आवडत असल्याने त्याने वयाच्या 10 वर्षांपर्यंत बास्केटबॉल खेळला.एके दिवशी वेई कडक उन्हात खूप वेळ बास्केटबॉल खेळत होता. आई खोर किम चोईने त्याच्या बास्केटबॉल खेळण्यावर बंदी घातली. वडिलांना बॅडमिंटन आवडायचे म्हणून त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षी वेईच्या हाती पहिल्यांदा रॅकेट दिली.वडील ली आ चोई त्याच्यासह बॅडमिंटन कोर्टवर गेले. वेई शाळेनंतर बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेऊ लागला.सिदेकने राष्ट्रीय संघात त्याची वयाच्या 17 वर्षी निवड केली. चोंग वेईने सहकारी खेळाडू वोंग म्यू चो हिच्याशी 2012 मध्ये लग्न केले. दोघांची 2001 मध्ये एका सराव शिबिरात भेट झाली होती.
8 महिन्यांची बंदी लागली होती
2009 मध्ये वोंग म्यू चोने वेईवर बेइमानी केल्याचा आरोप करताना ब्रेकअप केले होते. यानंतर लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर चोंग वेईने घोषणा केली की वोंग आणि तो आता एकत्र आहेत. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनी लग्न केले. आता त्यांचे दोन मुले किंग्स्टन आणि टेरेंस आहेत.त्याच्यावर बंदी असलेले औषध सेवन केल्याप्रकरणी 8 महिन्यांची बंदीसुद्धा लागली आहे. त्याचे आत्मचरित्र ‘डेअर टू बी ए चॅम्पियन’ 2012 मध्ये बेस्टसेलरपैकी एक होते. चोंग वेई एकेरीशिवाय मिश्र दुहेरीतही खेळतो, हे अनेकांना माहिती नाही. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर त्याला मलेशियाच्या पेनांग राज्याकडून आजीवन पेंशन सुरू झाली.
विक्रम
सलग 199 आठवडे नंबर वन राहण्याचा विक्रम
मलेशियाचा ऑलिम्पिकचा (3 रौप्य) सर्वांत यशस्वी खेळाडू
65 विजेतेपद, 3 ऑलिम्पिक रौप्य, 3 ऑल इंग्लंड, 3 सुपर सिरीज
पुरस्कार
5 वेळा बीडब्ल्यूएफ प्लेअर ऑफ द इयर
2 वेळा ऑलिम्पियन ऑफ इयर
4 वेळा नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड