सांगली : आईच्या प्रियकराकडून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला असल्याची घटना धक्कदायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सोनू उर्फ आतिष विजय देशमुख (वय 27) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रा.रमा उद्यानाजवळ, म्हाडा कॉलनी, मिरज) व 37 वर्षीय महिलेस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलीच्या आईच्या प्रियकरानेच वारंवार बलात्कार केल्याने सदरची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सोनू उर्फ आतिष विजय देशमुख (वय 27, रा.रमा उद्यानाजवळ, म्हाडा कॉलनी, मिरज) व 37 वर्षीय महिलेस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पिडीत मुलीचे वडील माधवनगर येथे राहत असून सदर मुलीची आई ही व्यभिचारी असल्याचे समजून आल्यानंतर 10 वर्षांपुर्वीच या मुलीच्या वडिलांनी सदर महिलेस घराबाहेर काढले. त्यानंतर ती मिरजेत रमा उद्यानजवळील म्हाडा कॉलनी येथे दोन मुली व मुलगा यांच्यासह राहत होती. दरम्यानच्या काळात या महिलेची सोनू उर्फ आतिष विजय देशमुख याच्याशी ओळख झाल्यानंतर या दोघांचे प्रेमसंबंध जुळले व तो तिचे आतिष देशमुख हा या महिलेच्या घरीच राहत आहे. अधिक चौकशीत संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभिर्य ओळखून मिरज शहर पोलीसांनी सोनु उर्फ आतिष विजय देशमुख याच्यासह सदर महिलेस ताब्यात घेतले असून महिलेचा सहभाग आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
सोनु उर्फ आतिष देशमुख हा आमच्या घरीच राहत होता. झोपण्यासाठी जमिनीला पाठ टेकताच मला गुंगी येत असे. आतिष मला गुंगीचे औषध देत असावा. सकाळी विवस्त्र अवस्थेत असल्याचे जाणवायचे.
– पिडीत मुलगी