मुंबई : ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सेलिब्रिटींच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या उलगडल्या जातात. येत्या आठवड्यात अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता नंदा करणच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा टीझरसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या प्रोमोमध्ये ‘रॅपिड फायर’ राऊंडदरम्यान अभिषेकने दिलेली उत्तरं पाहायला मिळत आहेत. तू सर्वांत जास्त कोणाला घाबरतोस, पत्नीला की आईला, असा प्रश्न करणने त्याला विचारला. त्यावर अभिषेकने आई असं उत्तर दिलं पण लगेचच श्वेताने पत्नीला जास्त घाबरतो असं मिश्कीलपणे म्हटलं. बहीण भावाच्या या मजेशीर गप्पांमुळे हा एपिसोड देखील धमाकेदार असणार आहे असे दिसून येत आहे.