जळगाव- आई मी बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी असलेल्या बोरअवेलवर अंघोळ करुन येतो, असे सांगून घरातून निघालेल्या किशोर पुना महाजन (वय 21, रा. कुसूंबा) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली.
मूळ धरणगाव येथील असलेला पूना दत्तू महाजन हे पत्नी व मुलासह यांच्यासह तीन वर्षापूर्वी कूसूंबा येथे स्थायिक झाले आहे. वर्षभरापूर्वी हृदयविकाराने पूना महाजन यांचा मृत्यू झाला. प्लॉट घेतला असल्याने ते याठिकाणी घराचे बांधकाम सुरु असून यापासून काही अंतरावरच खोली बांधली असून तेथे किशोर व त्याची आई भिखुबाई हे वास्तव्य करत होते.
आईनेच बघितला मृतदेह
शुक्रवारी नेहमीप्रमाणे उठल्यावर किशोरने आईला मी बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी दाढी करतो व यानंतर याच ठिकाणी बोरींगवरुन अंघोळ करुन येतो असे सांगून निघाला. अर्धातास उलटूनही किशोर परत येत नाही म्हणून भिखुबाई या प्लॉटच्या ठिकाणी गेल्या. याठिकाणी बांधकाम सुरु असलेल्या खोली त्याने छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत किशोरचा मृतदेह दिसून आला. मृतदेह बघताच आईने हंबरडा फोडला व एकच आरडाओरड करत एकच आक्रोश केला. आवाज एैकून गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह रुग्णालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले.
चॉकलेटच्या कंपनीतील कामगार
किशोर हा रामेश्वर कॉलनीतील चॉकलेट कंपनीत कामाला होता. गेल्या आठ दिवसांपासून तो घरीच होता. सर्व काही सुरळीत असतांना किशोरने आत्महत्या का केली? असा प्रश्न त्याच्या आईसह ग्रामस्थांना पडला आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.