मागील काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अभिनेत्री सेलिना जेटली हीने बिकीनीमध्ये आपले फोटो सोशल मिडियामध्ये शेयर करून चांगलीच चर्चा घडवून आणली होती. आता या माजी विश्वसुंंदरीने आणखी एक सुंदर फोटो शेयर केला आहे. ज्या सेलिना हिच्यासोबत ईशा देओल दिसत आहे.
या दोन्ही सुंदरीया दुबईत एका हॉटेलमध्ये एकमेकांना भेटल्या. त्यानंतर त्यांनी बरीच मजा केली. आई बनणार असणार्या या दोन्ही अभिनेत्री अशा फोटोंमध्ये अधिक सुंदर दिसत आहेत. या दोघी अभिनेत्री 2005साली ‘नो एन्ट्री’ या चित्रपटामध्ये दिसल्या होत्या. मार्च 2012 मध्ये सेलिना जेटलीने विन्सटन आणि विराज या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आणि यावेळीही ती पुन्हा जुळ्यांना जन्म देणार आहे. ईशालाचा 2012 मध्ये विवाह झाला आणि ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.