पिंपरी- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आई बाबा प्रतिष्ठान व सिद्धार्थ नवरात्र मित्र महोत्सव संस्थापक व स्विकृत सदस्य सुनील कदम यांच्यावतीने बोरमलबाथ महाराज प्रासादिक दिंडी मुळशीकर सर्व वारकर्यांना अन्नदान करण्यात आले. यासाठी भागवताचार्य अंजली सचिन गुरव, ह.भ.प. सचिन महाराज गुरव यांचे सहकार्य लाभले.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, आई बाबा प्रतिष्ठान व सिद्धार्थ नवरात्र मित्र महोत्सवाचे अध्यक्ष सुनील कदम, स्विकृत सदस्य दिनेश यादव आदी उपस्थित होते. अजित शेट्टी, रईज शेख, योगेश फटांगरे, अमित ठाकुर, नरेंद्र राजपूत, स्वप्नील मवाळ, प्रणव तुपे, तुषार पाटील, संकेत शिंगोटे, पंकज माने, मुनून शेख, राम सूर्यवंशी, स्वप्निल उदावंत, दिपक पालव, राहुल घाडगे, स्वप्निल काळभोर, मोहन धुमाळ, शुभम सुर्यवंशी, अनिकेत आसवले, मेघराज कसबेकर, रोहित सूर्यवंशी आदींनी संयोजन केले.