मंगळवेढात आई-वडिलांनी केली मुलीची हत्या

0

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील सलगरमध्ये आई-वडिलांनीच स्वतःच्या पोटाच्या मुलीला मारल्याची क्रूर आणि निंदनीय घटना समोर आली आहे. आपल्या मुलीचे शेतातील सालगड्याच्या मुलाशी प्रेमसंबंध होते आणि त्यांनी दोघांनी प्रेमविवाह केला.  हे समजल्यानंतर आई-वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या करून शेतातच तिचा मृतदेह पेटवून दिला.

अनुराधा बिराजदार असे त्या मुलीचे नाव आहे. ती बीएएमएसचं शिक्षण घेत होती. या दरम्यान तिचे शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगाराच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. परंतु, अनुराधाची सावत्र आई श्रीदेवी आणि वडील विठ्ठल बिराजदार यांना मात्र हे रुचलं नाही.

समाजातील बदनामीच्या खोट्या भीतीनं श्रीदेवी आणि विठ्ठल बिराजदार यांनी काल पहाटे आपल्या मुलीची हत्या केली. आणि कुणाला समजण्याच्या आत तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. या घटनेची कुणकुण लागताच काल रात्री पोलिसांनी श्रीदेवी आणि विठ्ठल यांना अटक केली.