पिंपरी-चिंचवड : आई-वडिलांचा आदर करणे, ही खरी भारतीय संस्कृती आहे. परंतु आजची युवा पिढी उच्चशिक्षित असूनही आपल्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्यातच त्यांचे सुख मानते, अशी खंत सोबती समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष श्यामराव खुडे यांनी व्यक्त केली. आकुर्डी येथे सोबती समाजसेवा संस्थेच्या वतीने मातंग समाज बांधवांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना खुडे बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती
या मेळाव्याचे उद्घाटन नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप, संभाजी ऐवले, सुनील भिसे, युवराज चांदणे, अशोक कांबळे, मनोज तोरडमल, नाना कसबे, भगवान शिंदे, रेणुका शिंदे, नंदकुमार सोळवंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी मातंग समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती. मेळावा उत्साहात पार पडला.
एकत्र कुटुंब पद्धती योग्य
श्यामराव खुडे पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती पुरातन काळापासून चालत आली आहे. परंतु बदलती जीवनशैली व कामानिमित्ताने कुटुंबातील सदस्यांना घरापासून दूर जावे लागत असल्याने एकत्र कुटुंब पद्धती लोप पावू लागली आहे. त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्यादेखील वाढत आहे, असे खुडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका शिंदे यांनी केले. तर नंदकुमार सोळवंडे यांनी आभार मानले.