वाकडमध्ये व्यावसायिक तरुणाची आत्महत्या !

0

पिंपरी-चिंचवड : मानसिक तणावात असलेल्या व्यावसायिक तरुणाने सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. कुशाग्र मनोज कंचन (वय ३०) रा. फ्लॅट नं. एफ १२०३, डायनेस्टी सोसायटी, वाकड, मूळ झांशी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

वाकड येथील या सोसायटीत आपल्या मित्रांसह बॅचलर राहत असे. त्याचा इलेक्ट्रॉनिक पार्टस पुरविण्याचा व्यवसाय होता. व्यवसायातील चढ उतारामुळे आणि व्यक्तिगत कारणामुळे तो मानसिक तणावाखाली वावरत होता, तर त्याला फिट येण्याचा देखील आजार होता. या सर्वांमुळे आलेल्या नैराश्यातून त्याने राहत असलेल्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत. याबाबत कुशाग्रच्या पालकांना कळविण्यात आले आहे.

‘माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो आहे. मी तुमच्या गरजा पूर्ण शकलो नाही. तुम्ही आता टेंशन घेऊ नका मला माफ करा आणि माझी ही सुसाईड नोट माझ्या पालकांना दाख’वा असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिलेला आहे