आई वडिलांची सेवा केल्यास मन राहते शांत

0

ह.भ.प.अनिल महाराज पाटील : मोईमध्ये आई महोत्सव

चिंबळी । सकाळी आई वडिलांची सेवा केली तर मन शांत राहून ज्ञान प्राप्त होईल. जो नेहमी आई वडिलांची सेवा करतो तोच खरा मनुष्य, असे प्रतिपादन ह.भ.प.अनिल महाराज पाटील यांनी केले. कै. मंजुळाबाई नथुजी गवारे यांच्या 24 व्या पुण्यस्मरणार्थ मोई येथे आयोजित केलेल्या आई महोत्सवातील किर्तन सेवेत ह. भ. प. अनिल महाराज पाटील बोलत होते.

आई महोत्सवानिमित्त तीन दिवस आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात रोज पहाटे काकड आरती, शिवलिला अमृत पारायण, संगीत भजन, हरिपाठ व किर्तन झाले. यामध्ये ह. भ. प पाडुरंग महाराज गिरी, धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे व ह.भ.प. अनिल महाराज पाटील यांचे कार्ल्याचे किर्तन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन मंजुळाबाई प्रतिष्ठान व शिवराज मित्र मोई यांच्या वतिने दिगाबंर गवारी, बाबासाहेब गवारी, संभाजी गवारी, संतोष गवारी, सचिन गवारी, पल्लवी गवारी, स्वप्निल गवारी, अनिकेत गवारी, प्रतिक गवारी यांनी केल्याचे इद्रायंणी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम गवारे यांनी सांगितले.