पनवेल : विद्यार्थ्यांनी आमच्याकडून प्राप्त झालेल्या वह्यांवर आई-वडिलांना कायम सन्मान वाटेल असेच लक्ष्य समोर ठेवून ज्ञानर्जन करावे, असे प्रतिपादन महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक रामजी बेरा यांनी केले. ते खारघर सेक्टर 22 मधील ओवे कॅम्प येथील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 250 गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी मार्घदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेविका तथा खारघर भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस बिना गोगरी यांनी केले होते. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणताही अडथळा निर्माण होवू नये, हेच उद्दिष्ट समोर ठेवून वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले असल्याचे मत नगरसेवक रामजी बेरा यांनी याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपा पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, विनोद घरत, सामाजिक कार्यकर्ते जयेश गोगरी, पनवेल तालुका अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष मन्सूर पटेल, विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, खारघर भाजपा सचिव विपुल चोटलीया तसेच अंबालाल पटेल, रामचंद्र जाधव, संतोष रेवणे, किशोर पाटील आणि मुख्याध्यापिका वंदना साळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.